INDIAN HISTORY

www.indianhistoryandtraveling.com


छत्रपति शिवाजी  राजे भोसलेछत्रपति शिवाजी  राजे भोसले १९ फेब्रुवारी (१६३० ते ०३ एप्रिल १६८० ) आपल्या कारकिर्दीत आपल्या पराक्रमाने भारतीय उपखंडाच्या बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा सामराज्याचे  संस्थापक होते .त्यांना अनेक नावानी सुद्धा ओळखल्या जात होते जसे शिवराय ,शिवाजी महाराज किंवा राजे नावाने ओळखत होते .शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध व मोगल शाही विरुद्ध संघर्ष करून मराठा राज्य स्थापन केले ..रायगड हि मराठा राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जात होते.शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून अभिषेख १६७४ मध्ये झाला .उत्कृष्ट योद्धा ,आदर्श शासनकर्ता ,प्रजाहित राजा म्हणून शिवाजी महाराजांची ओळख होती . शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिव जयंती म्हणून साजरा करण्यात येतो .शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र  संभाजी यांचा उल्लेख शिवशंभू म्हणून असा केला जातो.

शिवनेरी किल्ला 

शिस्तबद्ध सैनिक रचना सु संघटित प्रशाकीय यंत्रणा यांच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्य शाली आणि प्रागतिक राज्य निर्माण केले ..शिवाजी महारांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला . त्या परिसरात असलेले जीवधन, चावंड ,हडसर हे दुर्ग आणि नाणे घाटाची दगडात कोरलेली वाट पाहतां या दुर्गाचा प्राचीनत्वाचा अंदाज येतो .शिवाजी महारांच्या बालपणीचे विवरण शिवभारत या ग्रंथात कवींद्र परमानंदाने केले आहे .शिवनेरीवर कमीत कमी ४० ते ५० टाक्या आहेत .पाण्याचा मजबूत साथ या किल्ल्यावर होता. काही टाक्या बांधीव आहेत तर काही दगडावर कोरलेल्या आहेत .

शिवाजी महाराज जयंती शिवाजी जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सन मानला जातो .हा सन मराठा समाजाचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो .महाराष्ट्र बाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये  सार्वजनिक सुट्टी असते.

महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात .ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणकीणच वेगळी आहे .महाराष्ट्र बाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो. ग्रेगरिया दिनदर्शिका भारतात लागू झाल्यानंतर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात .महात्मा फुले ,महात्मा गांधी , बाबासाहेब आंबेडकर ,लोकमान्य टिळक ,या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरिया दिनदर्शिका लागु झाल्यानंतर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने साजरी केल्या जाते. 

तुकाराम बसवेश्वर ,शिवाजी तथागत बुद्ध यां साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगरिया दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी जालेला आहे ,त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने होत असतात .

राज्याभिषेख 

०६ जुन १६७४ रोजी शिवाजी राजांचा राज्याभिषेख करण्यात आला .त्या दिवसं पासून शिवाजी राजांनी राज्याभिषेक शक सुरु केला आणि शिवराई हे चालन जरी केले . या शिवाय नवी काळ गाणना सुरु होऊन नवा शक सुरु झाला . फारसी संस्कृती शब्दकोश बनवलं गेला .यामध्ये फारसी च्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जरी केले. तसेच पंचांग शुद्धी करण्याचे आदेश दिल्या गेले . यासाठी कृष्णा देवक नामक ज्योतिषी आणला तसेच त्या कडून करणकौस्तुभ ग्रंथ लिहून घेतला 0 Comments